• 1 Explore
  • 2 Experience
  • 3 Title text 2
    Content text...
  • 4 Title text 2
    Content text...
  • 5 Title text 2
    Content text...
  • 6 Title text 2
    Content text...
  • 7
  • 8 Title text 2
    Content text...
  • 9 Title text 2
    Content text...

ePrashala Marathi


भारतातील ग्रामीण शिक्षणाबद्दल अतिशय खेदाची बाब म्हणता येईल की ग्रामीण भागातील विद्यार्थी ५ ते ६ किलोमीटर पायी शाळेत जातात परंतू त्यांना शिकविण्यासाठी (अध्यापनासाठी) चांगली सोय होत नाही. लहानगी मुले तास दोन तास चालत जाऊन शाळा गाठतात आणि त्यांना त्या ठिकाणी योग्य कोणी शिकवतही नाही. बर्‍याच शाळा एकशिक्षकी असतात. एकाच शिक्षकाने सर्वच (१ली ते ४थी) वर्ग शिकवावे, सर्वच विषय शिकवावे. खरे तर ही परिस्थीती बदलणे गरजेचे आहे. आम्ही आजच्या "E-प्रशाला" माध्यमातून एक अशी प्रणाली (तंत्र) विकसीत केली आहे जिच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय खेड्यांतून ई-प्रशाला कार्यरत करून अध्यापनाची कमतरता भरून काढता येईल. भारतात किंबहूना जगात प्रथमच या प्रकारची संकल्पना आम्ही देत आहोत. ज्यात LED प्रक्षेपकांत संगणकाची जोडणी असेल. शिवाय म्हत्वाचे म्हणजे कोणत्याही पारंपारिक उर्जा स्त्रोताशिवाय (इलेक्ट्रीसीटी) म्हणजे सौर उर्जेवर ही प्रणाली कार्यरत होऊ शकते.

भारताची ग्रामीण शिक्षणाची गरज लक्षात घेऊनच या तंत्रज्ञानाची निर्मीती करण्यात आली आहे. ज्या भागातआजही पुरेशी विज पोहोचली नाही अशा भागातही या प्रणालीचा यशस्वीरीत्या या प्रणालीचा वापर होऊशकतो.

'E-प्रशाला' ही प्रणाली LED या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकाच वेळी १००विद्यार्थ्यांनी भरलेल्या वर्गात पुरेसा आवाज पोहोचेल एवढा आवाज देण्याची क्षमता या उपकरणात आहे. Solid state disc आणि Linux किंवा XP च्या सहाय्याने E-Prashala हे सॉफ्टवेअर ते १० वी च्याविद्यार्थ्यांसमोर सर्वच विषय प्रभावीपणे मांडू शकतो.

ईंग्लीश, मराठी आणि सेमी ईंग्लीश माध्यमातून शिक्षण देऊन (अध्यापनातून ) सोप्या पद्धतीतून पायाभूतगोष्टींचे ज्ञान करवून देण्याची क्षमता या तंत्रात आहे. शाळांमधून या तंत्राचा सहज आणि सोप्या पद्धतीनेआपल्या वेळापत्रकात कोणताही बदल करता वापर होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असणार्या Remote control च्या सहाय्याने त्यावरील चार Keys वापरून बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याची व्यवस्था आहे. म्हणजेचयातून प्रत्येक विद्यार्थ्याचा कोणता भाग कच्चा आहे किंवा त्याला अधिक मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे हे लक्षात येईल.

आमच्या नविन योजनेनुसार ज्या शाळा केंद्रीय प्रशासकीय पद्धतीत समाविष्ट होतील त्या शाळांना
Broadband internet data card च्या सहाय्याने त्यांच्या गरजेचे विषय एकाच ठिकाणाहून पुरविलेजाऊ शकतात. त्यांच्या परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. शिवाय ईतर शैक्षणीक कार्यक्रम , प्रौढशिक्षण, ज्येष्ठनागरीकांसाठी कार्यक्रम आणि शेतकर्यांसाठी शेतीविषयक माहिती आपण देऊ शकतो. या संपुर्ण प्रणालीलाकार्यरत करण्यासाठी केवळ ११० वॅट्स एवढी वीजक्षमता लागते. सौर उर्जेने ही गरज भागवणे शक्य होते. आणि निरंतर प्रतिदीन १६ तास ही प्रणाली कार्यरत राहू शकते. ‍ ‍